Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Devendra Fadnavis | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शेतकऱ्यांच्या वीज बीलाच्या मुद्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडले आणि हा यू टर्न आता चालणार नाही असं म्हंटलं आहे. राज्यात वीज बील न भरलेल्या शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यावर सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. (Supriya Sule On Devendra Fadnavis)

या व्हिडिओत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना, मध्य प्रदेश सरकारचे कौतुक करत आहेत. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटींची शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली आहेत. त्यामुळे तात्कालिन महाविकास आघाडी सरकारला देखील शेतकऱ्यांची वीज बिले माफ करण्याचे आव्हान ते करत आहेत. तर दुसरा व्हडिओ अलीकडचा आहे. त्यात ते शेतकऱ्यांना वीजेची बिले भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आता ते आपल्या वक्तत्यावरुन घूमजाव करत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच नियमित वीज बील भरणाऱ्यांची वीज कापण्यात येणार नाही, त्यामुळे सर्वांनी चालू बिले भरावीत, असे फडणवीस म्हणत आहेत. (Supriya Sule On Devendra Fadnavis)

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.
त्यांच्याकडे सध्या खाण्यासाठी देखील धान्य शिल्लक नाही. त्यामुळे अनेकांचे वीज बील थकले आहे.
त्यात राज्य सरकार आणि वसुली पथके शेतकऱ्यांकडून वीज बिले बळजबरीने गोळा करत आहेत.
वीज बील भरु न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावरील वीज कापण्यात येत आहे.
त्यामुळे शेतकरी आणखीणच संतापले आहेत.

Web Title :- Supriya Sule On Devendra Fadnavis | this u turn will no longer work supriya sules statement addressed to devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पेटीएम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवुन दुकानदाराची फसवणूक करणारा भामटा पुणे पोलिसांच्या जाळ्यात

Shraddha Walker Murder Case | श्रद्धाच्या पत्रावर पोलिसांनी कारवाई का केली नाही? देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Vikram Gokhale | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु