Supriya Sule On Irrigation Scam Maharashtra | सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरून सुप्रिया सुळेंचा इशारा; म्हणाल्या – ‘निवडणूक संपण्याची वाट पाहतेय, त्यानंतर फडणवीसांवर केस करणार’

Supriya Sule On Irrigation Scam Maharashtra | waiting for elections to end then case will be filed against devendra fadnavis supriya sule direct warning about rr patil file case

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Irrigation Scam Maharashtra | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फाईल का दाखवली म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. निवडणूक संपल्यानंतर आपण फडणवीसांवर केस करणार असल्याचे सुळे यांनी म्हंटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याचे अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवलीच कशी? आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे. त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल, कारण देवेंद्र फडणवीस यांना, ऑन ओथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुखमंत्री असतो, फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. ज्या व्यक्तीवर आपण केस करतो, त्या व्यक्तीला आपण बोलवून आपण फाईल दाखवतो हे योग्य आहे?

हा संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं आहे की, याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Total
0
Shares
Related Posts