Supriya Sule On Modi Govt | सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका, म्हणाल्या – ‘महिला आरक्षण म्हणजे तारीख नसलेला चेक’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule On Modi Govt | महिला आरक्षण (Women Reservation Bill) म्हणजे तारीख नसलेला चेक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षणाचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झाल्यानंतर आता त्यावर राष्ट्रपतींना शिक्कामोर्तब केल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर सुद्धा झाले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी २०१० पर्यंत होईल, अशी माहिती खुद्द अमित शहा (Ami Shah) यांनीच सभागृहात दिली असल्याने, महिला आरक्षणावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. (Supriya Sule On Modi Govt)

या संदर्भात एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, खंत एकाच गोष्टीची वाटते की, केंद्र सरकारने महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पण तो असा चेक दिलाय, ज्याच्यावर तारीखच नाही. केंद्र सरकारने आरक्षण दिलंय पण त्याला तारीख नाही. हे आरक्षण २०२९ ला मिळेल, २०३४ ला मिळेल की कधीच मिळणार नाही हे मात्र देवालाच ठावूक. (Supriya Sule On Modi Govt)

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारने जाहीर केलेले आरक्षण कधी मिळेल हे ठावूक नाही. परंतु, मी तुम्हाला एक शब्द देते. २०२४ मध्ये इंडिया आघाडीचे सरकार आले तर पुढच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने या देशातल्या प्रत्येक महिलेचा मान-सन्मान होईल. तसेच महिला आरक्षण लवकरात लवकर ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करू.

दरम्यान, मोदी सरकारच्या आरक्षणावर टीका करताना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे की,
संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर झाले असले तरी २०३४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हे
आरक्षण प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मोदी सरकारने मांडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar-Chhagan Bhujbal | ओबीसी बैठकीतील अजित पवारांसोबतच्या वादावर भुजबळांचे स्पष्टीकरण, ”एका घरात…”

Sudhir Mungantiwar | भाजपा राज्यातले मंत्री आणि आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार?

Vijay Wadettiwar On Ambadas Danve | ‘दानवे मराठा तरीही त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र’ – विजय वडेट्टीवार

Dog Bites Cases In Pune | पुण्यात आठ महिन्यांत तब्बल १४ हजार श्वानदंश, सुदैवाने एकालाही रेबीज नाही