Supriya Sule on Navneet Rana | ‘…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही’ – खा. सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule on Navneet Rana | मागील काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्य वाद सुरू आहे. यामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘नवनीत राणा यांच्यापेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत. तसेच, महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो आणि आम्ही देखील तोच विचार पुढे घेऊन जात असल्याचे,’ त्यांनी म्हटलं आहे. (Supriya Sule on Navneet Rana)

 

”देशामध्ये कोणालाही कुठे ही लढायचा अधिकार आहे. महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) हे पुरोगामी विचारांचे सरकार आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले,आंबेडकरांचे हे सरकार आहे.
त्यामुळे नवनीत राणा यांच्यापेक्षाही राज्यात अती गंभीर विषय आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयाकडे मी गांभीर्याने पाहत नाही.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्लीत जाऊन अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
महाराष्ट सरकारने त्यांच्यावर दाखल केले गुन्हे आणि खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये दिलेली वागणूक याबाबत तक्रार करण्यासाठी त्या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, जामीनावर बाहेर असताना नवनीत राणा यांनी न्यायालयाने घातलेल्या अटींचं पालन केलं नसल्याचं न्यायालयाने नोटीस मध्ये म्हटले आहे.
त्यामुळे आता नवनीत राणा यांना या विषयावर न्यायालयाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

 

Web Title :- Supriya Sule on Navneet Rana | ncp mp supriya sule said i does not take navneet ranas issue seriously

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kangana Ranaut Killer Look | अत्यंत रिवालिंग ड्रेस घालून कंगना रानौतनं चाहत्यांना लावलं वेड, व्हायरल फोटोनं इंटरनेटचं वाढवलं तापमान…!

 

Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा; जागा मालक बाळासाहेब दांगट याच्याविरुद्ध FIR (व्हिडीओ)

 

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत