मोदींच्या सततच्या दडपशाहीपुढं ‘जनता-पत्रकार’ मतं मांडू शकत नाहीत, ही तर छुपी आणीबाणी : खा. सुप्रिया सुळे

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कलम ३७० आणि काश्मीरमधील सद्यस्थितीच्या मुद्द्याचा धागा पकडून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले आहे. सध्या देशात छुपी आणीबाणी सुरु असून मोदी सरकारच्या वाढत्या दडपशाहीमुळे जनता किंवा पत्रकार मतंही मांडू शकत नाही असे म्हणत त्यांनी निशाणा साधला. संवाद दौऱ्याच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

सरकारची सातत्याची दडपशाही हे दुर्दैव :

पत्रकारांनी सुळे यांना कलम ३७० रद्द केल्याच्या च्या मद्द्यावरून प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, कलम ३७० आणि काश्मीर हा विषय चर्चेतून सोडवण्याचा आहे. आमचा मोदी सरकारच्या दडपशाहीच्या कार्यपद्धतीला विरोध असून कलम ३७० च्या निर्णयाला इतके दिवस होऊन देखील तेथील नेते सरकारच्या ताब्यात आहेत. ते कुठे आहेत. याबद्दल आम्हाला कोणालाच कल्पना नाही. त्यांचबरोबर त्या पुढे म्हणाल्या, हे दुर्दैव आहे कि हे सरकार नियम कायदे बनविताना दडपशाहीचा सतत वापर करत आहे. या जनतेची घुसमट होत असून मुळे जनता आपले आपले मतही मांडू शकत नाही. तसेच पत्रकारांनाही सततच्या धमक्या सुरु असून ते देखील सातत्याने दबावाखाली असल्याने मोकळेपणाने बोलू शकत नाहीत.

ही तर अघोषित, छुपी आणीबाणी :

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ज्या आणीबाणीच्या विरोधात हा पक्ष आणि ही नेहमी संघटना बोलत असते तसाच प्रकार हे लोकही करत असून ही देखील छुपी आणीबाणी आहे. देशात परिस्थिती तर तशाच प्रकारची असून फक्त अधिकृत घोषणा आणि ‘आणीबाणी’ असे नाव नाहीये. त्याचबरोबर हे माझे मत नसून पत्रकार स्वतः खाजगीत आम्हाला या गोष्टी बोलत असतात अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like