Supriya Sule On Praful Patel | ‘माझ्यामुळे पक्षाला अपयश मिळालं असेल तर…’, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Praful Patel | प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहीत, आठवड्यातून तीन वेळी ते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी भेटत होते, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पक्षाला आतापर्यंत जे यश मिळाले ते तुमच्यामुळे मिळालं आणि अपयश मिळालं ते माझ्यामुळे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते स्वीकारते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule On Praful Patel)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी (दि.1) नागपूर शहर, ग्रामीण, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी पक्ष संघटनेचा आढावा घेतला. यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, सहा दशके शरद पवार यांचा संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांसोबत ऋणानुबंध आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीमध्ये कोणती घुसमट होत होती ते त्यांनाच माहित. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ते शरद पवारांच्या दिल्लीतील घरी भेटायचे. सहा जनपथ जसे माझे घर होते तसे त्यांचे पण घर होते. पक्षाला जे यश मिळालं ते प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे आणि अपयश हे माझ्यामुळे असेल तर ते मी स्वीकारते, यालाच लीडरशीप म्हणतात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. (Supriya Sule On Praful Patel)

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या,
दिल्लीतल्या अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उभे केलेले दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडले.
त्यामुळे मराठी मणसांचे मोठे नुकसान झाले.
महाराष्ट्रात पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला आधी उपमुख्यमंत्री नंतर हाफ मुख्यमंत्री केले.
त्यामुळे दिल्लीतील अदृष्य हात महाराष्ट्राचे खच्चीकरण करत असल्याचे पाहायला मिळत आहे,
अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खून करुन शीर धडावेगळे करणाऱ्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेप