Supriya Sule On Raj Thackeray | अजित पवारांवर रेड पडते पण सुप्रिया सुळेंवर नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ! म्हणाल्या – ‘माझ्या भावाच्या घरी आजपर्यंत…’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Raj Thackeray | मनसे (MNS Chief Raj Thackeray) अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन्ही सभेत राष्ट्रवादीला (NCP) धारेवर धरलं आहे. ठाकरेंनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे (NCP Chief Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) घरी रेड पडते मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) नाही पडत, यामागे पवार असल्याचं म्हटलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावरून सोलापूर (Solapur) दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर, मला कोणाची चूक काढायची नसून माझा तो स्वभावही नाही पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या नवऱ्याला आयकर विभागाची (Income Tax Department) नोटीस आल्याची माहिती दिली.

 

मी बऱ्यापैकी त्यांच्याविरोधात भाषणात बोलते मात्र मला अजून तरी ईडीची नोटीस (ED Notice) आली नाही.
माझ्या नवऱ्याला आयकर विभागाकडून टॅक्सची नोटीस आली. तीन भाषणं विरोधात केल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता आयटीची नोटीस आल्याचं सुप्रिया सुळे हसत हसत म्हणाल्या.

दरम्यान, अजित पवार यांच्यावर छापेमारी होते पण सुप्रिया सुळे यांच्यावर अशी कारवाई होत नाही.
आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना (PM Narendra Modi) भेटत तर नसावेत ना,
असं म्हणत राज ठाकरेंनी थेट पवारांना टोला लगावला होता.

 

Web Title :- Supriya Sule On Raj Thackeray | NCP leader and MP supriya sule answers question on raj thackeray saying raid happened at ajit pawar home not on sharad pawars daughters home

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा