Supriya Sule on Raj Thackeray | ‘आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का?”; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule on Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी आपल्या तिन्ही सभांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (NCP Chief Sharad Pawar) पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार जाती जातीत भांडणं लावतात, राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यामध्ये जातीयवादाला (Racism) खतपाणी मिळालं असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी पवारांना लक्ष्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

आमच्यावर यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे संस्कार आहेत. चव्हाणांच्या कृतीमध्ये नम्रता होती, सहनशीलता होती. अल्टिमेटम हा शब्द आमच्या डिक्शनरीमध्ये नव्हता त्यामुळे मलाही या शब्दाचा अभ्यास नाही. आंब्याच्या झाडालाच दगड मारतात, बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारतं का ?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, सामनाच्या अग्रलेखातून (Samana Editorial) चीनच्या मुद्द्यावरून केलेली टीका आणि नवाब मलिक (Nawab Malik Health) यांच्या प्रकृतीबाबतही भाष्य केलं.
चीन हा महत्त्वाचा विषय असून भारताने गांभीर्याने घेतला पाहिजे. संसदेत मी अनेकवेळा यावर बोलते.
युद्ध कोणी जिंकत नाही, युद्धामुळे विधवा होतात त्यामुळे युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचा पर्याय नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

दरम्यान, नवाब मलिक यांची आम्हाला चिंता असून त्यांना चांगल्या डॉक्टरांच्या उपचाराची गरज आहे.
त्यासाठी आम्ही कोर्टात (Court) प्रयत्न करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

Web Title :- Supriya Sule on Raj Thackeray | NCP leader and MP supriya sule reply raj thackeray to allegations on sharad pawar politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा