Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | ‘ईडी’ सरकार हे इंग्रजांचे सरकार वाटतंय – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी राज्य सरकारची तुलना इंग्रजांसोबत आणि जनरल डायरसोबत केली आहे. जनरल डायर भारतात आला आणि घोर अन्याय केला. त्याचप्रमाणे सध्या राज्यातील सरकार देखील वागत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt)

 

इंग्रजांनी भारतीयांवर अन्याय केला. ‘ईडी’ सरकार देखील महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर जात आहेत. त्यामुळे सामान्य माणसांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे या निवडणुका तातडीने घेतल्या पाहिजेत. निवडणुकांसाठी झालेल्या सर्वेक्षणात राज्य सरकारला फारसे यश मिळताना दिसत नाही, त्यामुळेच ते निवडणुकांचा खोळंबा करत आहेत. हे सरकार निवडणुकांपासून पळवाटा काढत आहे, असे सुळे म्हणाल्या. पुण्यातील नवले पूलावरील अपघातांची मालिका थांबली पाहिजे. त्यासाठी आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना अनेक उपाय सांगितले आहेत. त्यातून त्यांनी बदल केले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. नवले पूल 100 टक्के सेफ्टीझोन झाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे, असेही यावेळी सुळे म्हणाल्या. (Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt)

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, तरी देखील हे सरकार सक्तीने शेतकऱ्यांकडून वीज बिले वसूल करत आहे.
हे सरकार शेतकरी विरोधी आहे. कांद्याच्या भावावरुन सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
अमानुष पद्धतीने शेतकऱ्यांकडून वीजबिले वसूल केली जात आहेत. तसेच त्यांची वीज तोडली जात आहे.
आधीच शेतकरी या वर्षीच्या नुकसानीने हवालदिल आहे.
त्यात विहिरीत पाणी असून देखील शेतकऱ्याला शेतीला पाणी देता येत नाही, असे यावेळी सुळेंनी सरकारला सुनावले.

 

Web Title :- Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | supriya sule criticisise the ed government seems to be the government of the british

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…