Supriya Sule | सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाल्या – ‘दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supriya Sule | गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाचा भडका उडाला आहे. या वाढलेल्या दरावरुन राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे. ‘इंधन दरवाढ रोखण्यासाठी केवळ निवडणुकाच सक्षम आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी केंद्रावर टिकास्त्र सोडलं आहे.

 

त्यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, ”जेव्हा निवडणूका असतात तेव्हा सरकार गॅस (Gas), पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरात वाढ करीत नाही. त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे की, आपण दर महिन्याला निवडणूक (Election) लावा म्हणजे सरकार तिकडे व्यस्त राहील परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत, अशा शब्दात सुळे यांनी टिपण्णी दिली आहे.’ महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, ”पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रणात नसल्याचा दावा सरकार करते,
मग निवडणुका सुरू असताना त्यावर नियंत्रण कसे होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत खोटं बोलण्याची मर्यादा असते,”
असे राजद नेते मनोज कूमार झा (Manoj Kumar Jha) म्हणाले आहेत.
दरम्यान, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी काल (मंगळवारी) लोकसभेतून सभात्याग केला होता.
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनाचे वाढलेल्या किंमती मागे घेण्याची मागणी केली होती.

 

Web Title :- Supriya Sule | only elections can stop fuel price hike says ncp leader and MP supriya sule on inflation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tara Sutaria Spotted | एवढे छोटे कपडे घालून खरेदीला निघाली तारा सुतारिया, कपडे पाहून रस्तावरील लोक तिला बघतच बसले..

 

Ravi Shastri | ‘बीसीसीआयमुळे मागील काही वर्षे मी कॉमेंन्ट्री केली नाही’; शास्त्री BCCI वर बरसले

 

Ameesha Patel Airport Photo | ‘गदर’ चित्रपटातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री आता दिसते अशी, एअरपार्टवरील फोटो झाले व्हायरल..