home page top 1

तिहेरी तलाक विधेयकाला सुप्रिया सुळे यांनी केला विरोध ; म्हणाल्या पुनर्विचार व्हावा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिहेरी तलाकच्या मुद्दयावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या मुद्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्याला विरोध केला आहे. सरकारने त्यांच्या बेटी पढाओ बेटी बढाओ या मुद्दयाकडे सरकारने लक्ष घालावे. महिलांना समान अधिकार द्यायचाच असेल तर महिला आरक्षणाचे विधेयक सम्मत करून मग निवडणुकीला सामोरे जावे असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत. तसेच त्यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्याला हि विरोध दर्शविला आहे.

सुप्रिया सुळे यांनी तिहेरी तलाक विधेयकाला विरोध करताना म्हणले कि मला एक बुजुर्ग मुस्लिम महिला औरंगाबाद मध्ये भेटली तिच्या सोबत तिच्या दोन मुली होत्या. त्या मुली डॉक्टर होत्या ती महिला मला म्हणाली कि माझ्या नवऱ्याने मला तलाक दिला तर मला माझ्या नवऱ्याला जेल मध्ये पाठवणे योग्य वाटणार नाही. कारण तो फक्त माझा नवरा नाही तर या दोन मुलींचा बाप पण आहे. म्हणून सरकार जे विधेयक आणत आहे हे योग्य विधेयक नाही असे ती महिला म्हणाली. हे उदाहरण सांगताना सुप्रिया सुळे यांना भाजपच्या अन्य सदस्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या त्या महिलांचा मी नंबर देते तुम्ही त्यांच्याशी फोन वरून बोला आणि काय सत्य आहे ते जाणून घ्या.

मी महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर फक्त बोलणारी नाही काम करणारी व्यक्ती आहे असे सुप्रिया सुळे सभागृहात म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी दुसरे एक उदाहरण देत म्हणल्या  कि, किरण कुलकर्णी हि हिंदू स्त्री आहे. ती जालना जिल्ह्यात राहते तिचा नवरा मुस्लिम आहे. दोघांचा प्रेम विवाह आहे. ती महिला हिंदू असून सुद्धा बुरखा घालते. मी तिला विचारले तू बुरखा का घालते तर ती म्हणाली कि मॅडम मला बुरखा घालणे आवडते आणि तुम्हाला सांगते या जगाच्या पाठीवर प्रेमाशिवाय अन्य कोणताच धर्म नाही. म्हणून तिहेरी तलाकचा मुद्दा थांबवला पाहिजे. कारण माझ्या नवऱ्याने मला तलाक दिला तर मी त्यांच्यावर खटला दाखल  नाही करू शकत कारण माझे त्याने तलाक दिला तरी त्याच्यावर प्रेम राहील. मी त्याला जेल मध्ये टाकू शकत नाही.

सुप्रिया सुळे यांनी दोन उदाहरणे सांगण्याबरोबर सरकरने महिला विधेयक हि अशाच तत्परतेने मंजूर करून घ्यावे तसेच त्यांनी महिला सबलीकरणासाठी हि अशीच पाऊले उचलावी असे सुप्रिया सुळे म्हणाल्या . तर सुळे यांनी या भाषणाच्या शेवटी तिहेरी तलाकच्या विधेयकाला विरोध दर्शविताना सरकारने या वर पुनर्विचार करावा असे म्हणले आहे.

Loading...
You might also like