छगन भुजबळांच्या पक्षांतराच्या चर्चांवर खा. सुप्रिया सुळे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. अशातच छगन भुजबळ हे लवकरच शिवसेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर सुप्रिया सुळेंची आपलं मत मांडत सूचक विधान केले आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार –

पक्षांतर करणाऱ्यांविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘राष्ट्रवादी हा केवळ फक्त पक्ष म्हणून काम नाही करत, तर एक कुटुंब म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपले निर्णय घ्यायचे अधिकार आहेत. दबावतंत्र वगैरे अशा गोष्टी आमच्या तत्वात बसत नाहीत. त्यामुळे कुणी पक्ष सोडून जात असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही. प्रत्येकाने शरद पवार यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांची, वर्षांची आठवण ठेवावी. पक्ष सोडून गेलेल्या प्रत्येकाने माझ्या वडिलांच्या आयुष्यात त्यांना साथ दिली आहे, याची जाणीव मला नेहमी राहील. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर आणि शुभेच्छाच असतील. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या मोठी पडझड सुरु आहे. अशा कठीण काळात आपली माणसं सोडून गेलं की वाईट वाटतं. कारण मोठ्या मेहनतीने ही संघटना उभी राहिली आहे.’

छगन भुजबळ यांच्या प्रवेशाला विरोध –

आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा छगन भुजबळ यांच्या प्रवेशाला विरोध आहे.

आरोग्यविषयक वृत्त –