‘अरे तो माझा ही बाप आहे रे, विसरु नका’, सुप्रिया सुळेंचं ‘उत्तर’ अन् कार्यकर्त्यांमध्ये एकच ‘हशा’

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर विधानसभेत महाआघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचार सभेत काही अनोख्याच घोषणा ऐकायला मिळाल्या. यावेळी ‘कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा बाप आला, अरे कोण आला रे कोण आला, मोदी-शाहांचा बाप आला’, या घोषणांनी सभा चांगलीच रंगली. आज शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. खरा हशा तर तेव्हा पिकला जेव्हा सुप्रिया सुळेंनी भाषणाला सुरुवात केली. सुप्रिया सुळेंनी भाषणाला सुरुवात केली तरी या घोषणा सुरुच होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टिप्पणी करत म्हणले की ‘अरे तो माझा पण बाप आहे, हे विसरु नका’, यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येणार, परिवर्तन होणारच, हे निर्विवाद सत्य आहे. साताऱ्याच्या सभेबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की काल पवार साहेबांचे भाषण बघून असे वाटले की दिल्लीच्या तख्तासमोर खंबीरपणे जर कुठला सह्याद्री उभा राहू शकतो तर ते शरद पवार साहेब.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की या बारामतीत जन्माला आलेला पुत्र हा देशातील कुठल्याही दिल्लीच्या तख्ताला घाबरत नाही. आरे ला कारे म्हणणारा कोण असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार. त्यामुळे तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असाच ठेवा असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

याआधी अजित दादांना एक लाख मताधिक्याने निवडून दिले, आता दोन लाख मताधिक्याने निवडून द्या, त्यावेळी राज्याचा नाही तर देशाचा रेकॉर्ड मोडायचा आहे असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांनी मतदारांना केले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like