पवार कुटुंबात सर्व काही आलबेल ? सुप्रिया सुळेंनी केला फेसबुकवर फोटो शेअर 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या लोकसभा निवडणुकांच्या राजकारणात पवार कुटुंबांची चर्चा सर्वत्र आहे .  त्यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल आहे की नाही याबद्दल सर्वांना साशंकता आहे . त्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या कुटुंबाचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत . त्यामुळे आता पवार कुटुंबांत सर्वकाही आलबेल म्हणाव लागेल.

सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या फोटोत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र दिसत आहेत . तसंच सुप्रिया सुळेंनी हा कुटुंबांचा फोटो शेअर करत फन टाईम विथ फॅमिली , असं कॅप्शन दिलं आहे .  त्यामुळे हा फोटो शेअर करुन सुप्रिया सुळे पवार कुटुंबात सर्व आलबेल असल्याचे दाखवत आहेत की काय ,  असा सवाल उपस्थित होत आहे.

supriya-sule

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून हट्ट धरला होता. त्यावर तो शरद पवार यांनी पूर्ण करत राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या उमेदवार यादीत पार्थ पवार यांचं नाव जाहीर केलं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली. तसंच एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढावावी, असं म्हणत पवार यांनी माघार घेतली होती. त्यावर पार्थ यांच्या उमेदवारीमुळेच शरद पवार यांनी माघार घेतली असं म्हटलं जात होते. तशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत होत्या .  त्यानंतर शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहीत शरद पवार यांनी निवडणुकीतील उमेदवारीवर पुन्हा एकदा विचार करावा अशी इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, या सर्व प्रकारांवरून पवार कुटुंबात काहीच व्यवस्थित नाही अशा चर्चा आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी फॅमिली फोटो शेअर करत, सर्वकाही ठिकठाक असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असं म्हटलं जात आहे.