अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीबाबत पहिल्यांदाच खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितलं, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचा खुलासा शरद पवार यांनी कालच केला. यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या भाजपबरोबर सरकार स्थापनेत सहभागी होण्याविषयी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीच भाजपसोबत गेले नव्हते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, जे झालं तरे आमच्या पक्षाचं आणि आमच्या कुटुंबाचं वैयक्तिक प्रकरण होतं. अजित पवार हे पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कायमच माझे मोठे भाऊ राहतील असे म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भविष्यात भाजपसोबत जाणार का यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट नकार दिला नाही. मात्र, जे पक्षाचं मत असेल, तेच माझं असेल, मी पक्षाची अनुशासित शिपाई आहे. त्यामुळे माझं वेगळं मत नसले, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. सोमवारी शरद पवार यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भेटीमध्ये जे काय घडले ते सांगितले. भेटी दरम्यान सुप्रिया सुळेंना मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. यावर विचारले असता त्या म्हणाल्या, ही भेट ही दोन मोठ्या नेत्यांची होती. त्या भेटीत मी नव्हते. पंतप्रधानांनी मला मंत्रिपदाची ऑफर देणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Visit : policenama.com