Supriya Sule-Sunetra Ajit Pawar | बारामतीमध्ये रंगणार ‘नणंद विरूद्ध भावजय’ सामना? सुनेत्रा अजित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

मुंबई : Supriya Sule-Sunetra Ajit Pawar | राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार विरूद्ध पवार असा सामना सध्या रोजच्या रोज कुठे ना कुठे रंगतच असतो. आता तर अशी चर्चा आहे की, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरूद्ध लढणार आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगणार, अशी चर्चा आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यांच्या विचारांना साजेशी आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. (Supriya Sule-Sunetra Ajit Pawar)

याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे म्हणणे आहे की, आमच्याकडे तरी लोकशाही आहे. दिल्ली दडपशाही सुरू असते, हे संपूर्ण देश पाहत आहे. पण आमच्याकडे लोकशाहीच आहे. त्यामुळे मला वाटते की, कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा मान-सन्मान केला पाहिजे. (Supriya Sule-Sunetra Ajit Pawar)

खासदार सुळे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी तीन वेळा माझ्या विरोधात निवडणूक लढली.
यावेळीही कुणीतरी माझ्याविरोधात लढणारच आहे. मी लोकशाहीचे मनापासून स्वागत करते. ही लोकशाही जगली पाहिजे.
टिकली पाहिजे. आपण अशा सर्व निर्णयांचे पूर्ण ताकदीने स्वागत केलेच पाहिजे. कुणीतरी विरोधात लढलेच पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanchit Bahujan Aghadi To Congress | VBA चा काँग्रेसला अल्टिमेटम! ७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू

PM Narendra Modi-Urjit Patel | पंतप्रधान मोदी RBI गव्हर्नरला म्हणाले होते, पैशाच्या ढिगार्‍यावर बसलेला साप, कोणी सांगितला प्रसंग…वाचा