Supriya Sule | ‘मला पंतप्रधान मोदींची काळजी वाटते,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi In Mumbai) हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तसेच विविध नवीन योजनांच्या भूमीपुजनासाठी आज (दि. १९) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यावर महाविकास आघाडीचे नेते चांगलीच टीका करताना दिसत आहेत. त्यातच आज राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबई दौऱ्यावर निशाना साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागतच करतो. भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली, यशवंत सिन्हा, सुषमा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहेत. मात्र आज यांच्यासारखे नेते भाजपमध्ये नाहीत. याचे वाईट वाटते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बिचाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकीपासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाना साधला.

दरम्यान, बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माथाडी कामगारांच्या त्रासामुळे राज्यातील उद्योग इतर राज्यात गेल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, ‘राज्यात सर्वाधिक उद्योग आले आहेत. अनेक आकडेवारी मधून समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधान करणे योग्य नसून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. हे लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे कसे कमी होतील. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.’ असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दावोस दौऱ्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यातील फोटो मी पाहिले. त्यातील काही उद्योजक हैदराबाद येथील आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती.
ते उद्योजक हैदराबाद येथून मुंबईत आले असते आणि तिथे करार झाले असते.’
अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर केली आहे.

 

 

Web Title :- Supriya Sule | supria sule comment on pm narendra modi maharashtra tour

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा