Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाने डोके वर काढले आहे. त्यामुळे दोनही राज्यात वाद सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील कर्नाटकला जाणार होते. पण त्यांना कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने ते जाऊ शकले नाहीत. त्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांनी 1986 च्या आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, पण माघार घेतली नाही, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

“कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरू झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवारसाहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली.” असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड भाषा अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय महाराष्ट्रात झाला. एस.एम. जोशी यांनी 1986 मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचे नियोजन केले गेले. महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये जाऊन भर चौकात निषेध नोंदवतील, असे ठरले. याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली. पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे दिले गेले. बेळगावात दाखल होण्यासाठी शरद पवारांनी एक शक्कल लढवली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली.

सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. शरद पवारांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली.
खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवले. तिघे जण निघाले. नाक्यावर पोलिसांनी चौकशी केली. परंतु त्यांना काहीच कळले नाही. शरद पवार बेळगावात दाखल झाले. बेळगावात जमावबंदी होती. शरद पवार पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी थांबले होते. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर 11 वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलीस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार, बाबासाहेब कुपेकर आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली.

त्यानंतर शरद पवारांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आले.
तेथेही लोक जमा झाले. एस. एम. जोशी शरद पवारांना भेटायला गेले.
त्यांनी त्यांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एस एम जोशी हळहळले होते.
हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच 360 अंशात बदलले आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला.

Web Title :- Supriya Sule | supriya sule criticized on minister belgaon visit remember sharad pawar 1986 agitation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू