Supriya Sule | पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळे आक्रमक; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना म्हणाल्या – ‘झेपत नसेल तर…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज दि.३० दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी पुणे येथे आल्या असता, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले. पुण्यात दहशत माजवणारी कोयता गँग असेल, किंवा ग्रामीण भागातील गुन्हेगारी. एकंदरीतच, पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकविण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे, या सर्व घटना लक्षात घेता, यामध्ये गृहमंत्रालयाचे अपयश दिसते. त्यामुळे ‘गृहमंत्र्यांनी जबाब दो’ या राज्यात चाललंय काय? असा प्रश्न देखील यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला. तर झेपत नसेल तर राजीनामा द्या. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली.

 

दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सभा खडकवासला परिसरात होत आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता. त्या म्हणाल्या, सर्वांच्या सभा सर्व ठिकाणी झाल्या पाहिजेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये गैर काय आहे. आपल्या संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिला असून आम्ही काही दडपशाहीवाले नाहीत. कोणी कुठेही जायचे, धमक्या द्यायचे ही आमची परिस्थिती नाही. सर्वांनी सर्वांच्या मतदारसंघात जावे, देशाच्या सेवेसाठी लढावे. मी त्यांचे स्वागतच करते. असे यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आचारसंहिता भंग झाला आहे.
त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारले असता त्या म्हणाल्या, त्यावर मला काहीही आश्चर्य वाटत नाही.
नियमावर केंद्र आणि राज्य सरकार चालतच नाही. विरोधकांसाठी नियम आणि कायदे आहेत.
त्यामुळे त्यांना ‘सौ खून माफ’ असतात. असा टोला त्यांनी यावेळी बोलताना सत्ताधारी भाजपला लगावला.
देशाचा बजेटवर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, या बजेटमध्ये महागाई व बेरोजगारी यांवर ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
या सरकारचे हे शेवटचे मोठे बजेट आहे. केंद्र सरकारकडे २०२४ च्या निवडणुकी आधी ही शेवटची संधी आहे.
असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

 

Web Title :- Supriya Sule | supriya sule for agitation in pune comment on crime in pune and criticize devendra fadnavis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीवरुन आघाडीत बिघाडी?, शिवसेना निवडणूक लढवणार, काँग्रेस काय घेणार निर्णय?

Amol Mitkari | संत तुकाराम महाराजांवर केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी आक्रमक; म्हणाले…

Pune Crime News | सहा महिन्यापूर्वीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; येरवडा पोलीस ठाण्यात FIR