Supriya Sule | केतकी चितळेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. केतकीच्या पोस्ट नंतर सर्वच स्तरातून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेवर ही प्रतिक्रिया दिली.

 

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे, यावर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, कायदा (Law) योग्य ते काम करेल, मी काय बोलणार. एक तरी मी ओळखतही नाही. मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का ? कुठल्या संस्कृतीत हे बसतं ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

यातून मराठी संस्कृती दिसते
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, या निमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) या तिघांचेही जाहीर आभार मानते.
त्यांनी या कृतीच्या विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे.
कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत:त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन.
कारण, ही जी विकृती सुरु झाली आहे, ती समजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते.
अशी जी प्रवृत्ती आहे तिचं कुठल्याही समाजात जगामध्ये कोणी तिचं समर्थन करु शकत नाही.

पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घ्यावी
यावेळी पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि गॅसच्या (Gas) वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्या म्हणाल्या,
माझी पंतप्रधानांना (PM) विनंती आहे की त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घ्यावी.
सगळं राजकारण बाजूला ठेवून आज महागाईवर सगळी राज्य आणि केंद्र सरकार (Central Government) एक देश म्हणून आपण काय करु शकतो, यावर चर्चा करणे हे आता काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

रेड टाकण्याचा केंद्राने विक्रम केला
केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) कारवायांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक करुन अनेक महिने झाले आहेत.
त्यातून काहीही निष्पन्न होत नाही.
आरोप करणारा माणूस गायब आहे त्यांच्यावर 109 वेळा रेड टाकण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे.
जर 109 वेळा तुम्हाला रेड करावी लागत असेल, तर 108 वेळा तुम्ही काय केलं ? यांना काहीच मिळालं नसल्याने त्यांना इतक्या वेळा रेड करावी लागत आहे.

 

Web Title :- Supriya Sule | supriya sule responds on ketki chitale in case of offensive post about sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा