Supriya Sule | पुण्यातील नालेसफाईच्या कामाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी

Supriya Sule Beed Visit | This fight will be fought as humanity, Supriya Sule's declaration in Massajog, the mother of deceased Santosh Deshmukh burst into tears, "My Ram is gone..."

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | पुण्यात पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली त्यावरून आता महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) कारभारावर चहुबाजुंनी टीका होत आहे. याबाबत आमदार रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) महापालिकेच्या कामकाजावर बोट ठेवत टीका केली होती. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्हाधिकरी आणि महापालिका आयुक्तांना उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या असल्याची माहिती माध्यमांना बोलताना दिली.(Supriya Sule)

“पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला!” असे म्हणत जयंत पाटलांनी भाजपला खोचक टोलाही दिला होता. शहरात पावसाळीपूर्व कामे करताना नालेसफाई व अन्य कामांसाठी ११ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. पण कामे का झाली नाही. पुणे शहर का तुंबले, असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र देशमुख (Dr Rajendra Deshmukh) यांना धारेवर धरले.

तसेच या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या .
याबाबत प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. जर नालेसफाई आणि पाणी तुंबण्याचे हे प्रकार थांबले नाहीत
तर रस्त्यावर उतरू असा इशारा सुळेंनी दिला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ” आज आम्ही पाणी साचलेल्या भागात पाहणी केली. यात नाल्यावरून रस्ते केलेले आढळून आले.
यात पाण्याचे आउटलेट बंद असल्याचे दिसून आले. ५० ठिकाणी नाले ब्लॉक केले गेले आहेत. रस्त्यांची लेव्हल चुकली आहे.

नालेसफाई करण्यात जो ठेकेदार कामचुकारपणा करतो त्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही. पुणे- सातारा रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्लॅक लिस्ट केले तसे महापालिका का कोणावर कारवाई करीत नाही, असा प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | ठाकरे- भाजपाचं मनोमिलन?; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण

Special Session Of Parliament | संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? सभापती कोण?; जाणून घ्या

Mundhwa Pune Crime News | खुनातील आरोपी एका तासात गजाआड, मुंढवा पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap Case | पुणे : लाच घेताना वासुली गावचा तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chandrakant Patil On Vinod Tawade | ‘विनोद तावडे मोठे होतील, त्याचा आम्हाला आनंदच आहे’; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

Total
0
Shares
Related Posts