Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Supriya Sule | शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) या पक्षांमध्ये नुकतीच युती झाली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर ही युती केली गेली असल्याचे बोलले जाते. मात्र या युतीनंतर महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घेणार का? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या आघाडीतील दोन प्रमुख पक्षांनी आपापली मते जाहीर केली आहेत. याबाबतचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे अद्याप आलेला नाही. असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितले आहे. त्यातच आज माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, ‘महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जेव्हा भेटतील तेव्हा यावर चर्चा होईल. कोणी काही प्रस्ताव आणला तर याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा होऊ शकते.’ असं यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर त्यांनी पुढे बोलताना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) टीका केली. त्या म्हणाल्या, ‘ते रोजचं आरोप करत आहेत. त्यांना सत्तेत येवून सहा महिने झाले, मात्र त्यांनी काम काहीचं केले नाही. स्वतःकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे रिवाईंड आणि प्लेचं काम ईडी सरकारकडून सुरू आहे.’ असा टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना शिवसेनेच्या शिंदे गटाला लगावला.
दरम्यान, शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)
यांना वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर प्रश्न विचारला असता, युतीबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली
नसल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच त्यांच्यासोबत युतीबाबत कोणताही प्रस्ताव आला नसल्याने चर्चा कशी करणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
Web Title :- Supriya Sule | supriya sules reaction on vanchit bahujan aghadi alliance
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sai Tamhankar | मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे एवढ्या कोटींची मालकीण जाणून घेऊया तिच्याबद्दल
Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत
Latur Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल