Supriya Sule | सुप्रिया सुळेंच्या विजयाने इंदापूरातील निवडणुकांचे चित्र बदलणार

इंदापूर: Supriya Sule | भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे एकेकाळी अजित पवार यांचे कट्टर विरोधक मानले जायचे. पण आता युती धर्म पाळण्यासाठी हे सर्व नेते एकत्र आले. हर्षवर्धन पाटील हे बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार या विजयी व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील होते.(Supriya Sule)

१९९१ साली हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील यांचं बारामती मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट कापून शरद पवार यांनी पुतणे अजित पवार यांना तिकीट दिलं. तेव्हापासून शंकरराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबीयांबाबत नाराज आहेत.

१९९५ साली हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते. मात्र, तेव्हाही त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. मग अपक्ष लढून ते विजयी झाले. त्यामुळं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष सुरूच झाला.१९९५, १९९९, २००४ आणि २००९ अशा चारवेळा ते विधानसभेत इंदापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.

इंदापूरच्या जागेबाबत आपणावर नेहमी अन्याय केला असल्याचे हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या नावानिशी अनेकदा बोलून दाखवले होते. पाटलांचे पवारांशी असलेले, त्यात अजित पवारांशी असलेले राजकीय वैर अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केला. लोकसभेच्या तोंडावर अजित पवार काही नेत्यांना घेऊन महायुतीत सामील झाले.

बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती. यात सुप्रिया सुळे विजयी झाल्या तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. सुप्रिया सुळे यांना इंदापूर मधून २५ हजार ६८९ मतांचे लीड मिळाले. म्हणजे मोठ्या नेत्यांची फौज असताना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला.

इंदापूर तालुक्यातून मागील वर्षी पेक्षा मतदानाची आघाडी कमी झाली असली तरी त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, जिल्हा परिषद गटाचे सात सदस्य, पंचायत समिती गटाचे प्रदीप जगदाळे वगळता १३ सदस्य, दोन्हीही कारखान्याचे संचालक अशी शेकडो नेतेमंडळींची फौज त्यांच्या मागे असताना देखील खा. सुळे यांनी तालुक्यातून घेतलेली आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

सुप्रिया सुळे यांच्या विजयामध्ये पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुकाध्यक्ष ऍड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, सागर मिसाळ यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

इंदापूर शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना धोबीपछाड देत माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव ऍड. राहुल मखरे यांनी शहरातून सुप्रिया सुळे यांना आघाडी दिली आहे. त्यामुळे इंदापूर नगर परिषदेसाठी तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आणि आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकरांच्या विजयाचं गणित नेमकं कुठं चुकलं? ‘ही’ आहेत धंगेकरांच्या पराभवाची कारणे…

Chandrababu Naidu | सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु; चंद्राबाबू नायडूंच्या दोन अटी भाजपा मान्य करणार?