दौंडमधील पूरग्रस्त भागाला खा. सुप्रिया सुळेंची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – धरण साखळीवर झालेल्या अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील मुळा-मुठा आणि भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. या पुरामध्ये नानगाव, कानगाव, पारगाव, हातवळन या गावांसह दौंड शहरामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले असूूून
त्यामुळे तेथील नागरिक आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून तेथील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
Supriya-Sule

या पूरग्रस्त भागाला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर डाळिंब बागांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन त्यांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
Supriya-Sule
दौंड शहरामध्ये काही ठिकाणी त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि ब्लँकेट वितरण केले.

आरोग्यविषयक वृत्त