खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त मतदारांच्या गाठी भेटीस ग्रामीण भागात सुरुवात

पुरंदर मधील वाल्हे येथे मतदारांना जाहीरनाम्याचे वाटप

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन – बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार व विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त ग्रामीण भागातील कार्यकर्ते मतदाराच्या गाठी भेठी घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या नेतृत्वाखाली माजी जि.प.सदस्य विराज काकडे, वाल्ह्याचे सरपंच अमोल खवले, महादेव चव्हाण, अभिजित दुर्गाडे, संदेश पवार, दिपक कुमठेकर, तेजपाल सणस, सुनील भुजबळ, सचिन भोसले आदींसह कार्यकर्त्यांनी वाल्हे येथे मतदाराच्या घरोघरी जाऊन व व्यापाऱ्यांच्या भेटी घेत जाहीरनाम्याचे वाटप केले व मतदारांना सुप्रिया सुळे यांच्या कार्याची माहिती दिली. मात्र विरोधी पक्षाचा आजपर्यंत उमेदवार जाहीर झाला नसताना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

यावेळी डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले कि, ट्रिपल तलाकचा प्रश्न, पुण्याच्या कचऱ्याचा प्रश्न, मुलींना वाटप केलेल्या सायकल, केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे देशात बारामती लोकसभा मतदार संघात केलेले उत्कृष्ट काम, आपल्या मतदार संघात सातत्याने संपर्क ठेवत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच आतापर्यंत पाच वेळा आदर्श संसदरत्न पुरस्कार मिळाला यावरून खा.सुप्रिया सुळेचे काम मोठे असून त्यांनी लोकसभेमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमठ्विला असल्याचे लक्षात येते.

खा. सुप्रिया सुळे या खासदार झाल्यानंतर देशाचे प्रश्न मांडत असताना मुलींना सायकल, चष्मा, श्रवणयंत्र, काठी वाटप करण्याचे काय गरज आहे का ? असे काही लोक प्रश्न विचारतात त्यांना सांगावेसे वाटते कि, सुप्रिया सुळे यांनी खासदार म्हणून धोरण ठरविण्याचे काम केले असून त्यांना पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसेच सामान्य व गरीब जनतेच्या असलेल्या अडचणी ओळखून याचा विचार करीत असताना त्यांनी स्वतःचा असलेला प्रभाव व कार्पोरेट मध्ये त्यांची असलेली ओळख व पवार चरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामान्य लोकांना मदत केली तर कुणाला पोटात दुखायचे काय कारण नाही. तसेच त्यांनी खासदार म्हणूनही प्रभावी काम केले असून जे काम आमदार, मंत्र्यांना जमले नाही ते त्यांनी सामान्य लोकांसाठी हे अधिकचे काम केले आहे. त्यामुळे टीका करणार्याची अवस्था ‘नाचता येईना आंगण वाकडे’ अशी झाली असल्याचे डॉ.दुर्गाडे म्हणाले.