सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

आत्मस्तुतीत दंग असणाऱ्या सरकारने रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रोज नवनव्या डेडलाईन देत ‘तारीख पे तारीख’ हा खेळ सुरु ठेवला आहे.. या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ हे आंदोलन सुरु करण्याची गरज आहे, असे आवाहन करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्यभर ‘सेल्फी विथ खड्डा’ ही मोहीम सुरु केली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fad4d803-ab7b-11e8-b6a7-f5f281d03f0d’]

राज्य प्रगतीच्या मार्गावरुन चालत असल्याचा प्रचार सरकार एकीकडे करीत आहे. दुसरीकडे परिस्थिती मात्र त्याच्या विपरीत आहे. प्रगतीचा मार्ग तर सोडाच परंतु ज्या रस्त्यावरुन राज्यातील जनता रोज ये-जा करते ते रस्ते देखील धड नाहीत. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे. ज्या शहरांना स्मार्ट करण्याचे ढोल या सरकारने पिटले त्या शहरांमध्येही हिच स्थिती आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या मोठ्या शहरांतील रस्त्यांची स्थिती विदारक आहे. याखेरीज राज्यांतील इतर शहरांना जोडणाऱ्या तसेच खेड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दारुण अवस्था झाली आहे.

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार 

या रस्त्यांची डागडुजी व्हावी, नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी आपण सर्वांनी यापुर्वी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभिनव आंदोलन पुकारत यापूर्वीही सत्ताधाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा हे राज्य खड्ड्यात जावे अशी तुमची इच्छा आहे का ? हा खडा सवाल आपण या सरकारला विचारणार आहोत. हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत फोटो काढून तो फेसबुक, ट्विटर या सोशल मिडियावर अपलोड करायचा आहे.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0fa1b3c1-ab7c-11e8-92f0-e92a35fd384b’]

या फोटोसोबत #SelfieWithPotholes हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन सुळे यांनी केले आहे. हे फोटो सत्ताधाऱ्यांना जाग आणतील. चांगले रस्ते हा जनतेचा हक्क असताना आमच्या माथी खड्डेयुक्त रस्ते का, या थेट प्रश्नाचे उत्तर या सरकारला द्यावेच लागेल. काहीही झाले तरी हे राज्य खड्ड्यात जाता कामा नये. या राज्यातील रस्ते दुरुस्त आणि वाहतूकीसाठी सुसह्य झालेच पाहिजेत, त्यासाठी आता आवाज उठवूयात, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस  

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like