सुप्रिया सुळेंनी देखील भर पावसात घेतली सभा

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन : मुरबाडमध्ये जाहीर सभेच्या वेळी आलेल्या मुसळधार पावसातही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. मुरबाडच्या कायापालटासाठी प्रमोद हिंदूराव यांच्यावर मतांचा पाऊस पाडून विजयी करण्याचे आवाहन केले.

मुरबाड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार प्रमोद हिंदूराव यांच्या प्रचारासाठी मुरबाड शहरातील खुल्या नाट्यगृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या आगमनाआधी दहा मिनिटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, खु्र्च्या डोक्यावर घेत मुसळधार पावसातही शेकडो कार्यकर्ते व नागरिक मैदानात उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस सुभाष पिसाळ, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, नगरसेवक आशिष दामले, राजाभाऊ सासे, श्रीमती सुमनताई शांताराम घोलप,परशराम भोईर, चेतनसिंह पवार, विलास कुंभार, आंबो वाघ, बाळाराम सुर्यराव, नरेश मोरे, कृष्णकांत तुपे आदी उपस्थित होते.

प्रमोद हिंदूराव यांच्या विजयासाठी आपल्याला पावसाने आशिर्वाद दिल्याचे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषणाला सुरुवात केली. मुसळधार पावसाप्रमाणे हिंदूराव यांच्यावर नागरिकांनी मतांचा पाऊस पाडावा, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, “मुरबाडमध्ये विकासाची पिछेहाट झाली. मात्र, आता प्रमोद हिंदूराव यांना निवडून दिल्यास मुरबाडचा विकास होऊ शकेल. मुरबाड तालुक्यातील पाणीटंचाईला सर्वोच्च प्राधान्य देऊ.

महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे पहिले काम केले जाईल. मुरबाड व बदलापूर येथील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कटीबद्ध आहे.”गेल्या दहा वर्षांत मुरबाड मतदारसंघाची मोठी पिछेहाट झाली. ग्रामीण भागाबरोबरच बदलापूर शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मुरबाडमध्ये एमआयडीसी ठप्प झाली असून, शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. तर बदलापूर शहराशेजारी उल्हास नदी बारमाही वाहत असूनही पाणीटंचाई आहे.

या परिस्थितीतून विकासासाठी बारामती पॅटर्न लागू केला जाईल, मुख्यमंत्र्यांन असे प्रमोद हिंदूराव यांनी दिले. मुरबाड भागात टेक्सटाईल पार्क, बेरोजगारांना रोजगार, बारवी प्रकल्पग्रस्तांना नोकरी व घर, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी मासिक हप्त्याची सुविधा आदी कामे करण्यात येतील, असे आश्वासन हिंदूराव यांनी दिले.