लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ संशयित बॅगमुळे खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ गुरुवारी एक संशयित बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. परंतु पुणे पोलिसांच्या बीडीडीएस पथकाकडून त्याची तपासणी केल्यावर फुगलेली बॅग रिकामीच असल्याने तिच्यात काहीच आढळून आले नाही.

बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडुशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ असलेल्या एका दुकानासमोर गुरुवारी नागरिकांना एक संशयित बॅग आढळून आली. त्यावेळी नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. बॅगमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली होती. मध्यवस्तीतील व संवेदनशील ठिकाण असल्याने तात्काळ बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस) ला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस आणि बीडीडीएसच्या पथकाने बॅगची तपासणी केली. पथकाने जाऊन त्यावेळी बॅगमध्ये काहीच नसल्याचे समोर आले. ती बॅग फुगलेली असल्याने संशयित वाटली होती असे पोलीसांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us