Blast In Bharuch : गुजरातच्या भरूचमध्ये फॅक्टरीत स्फोट, 8 ठार, 50 जण होरपळले

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  –  गुजरातच्या भरूच जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात दाहेजमध्ये एका रासायनिक फॅक्टरीत स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली, ज्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 50 मजूर जखमी झाले. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनेनंतर दु:ख व्यक्त केले असून नुकसान भरपाईची घोषणा केली आहे, तर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी औद्योगिक सुरक्षा नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भरूचचे पोलीस अधीक्षक राजेंद्र सिंह चूडासामा यांनी सांगितले की, इंडस्ट्रियल एस्टेटमध्ये यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बॉयलर फाटल्याने आग लागली आणि धुराचे लोट उठले. स्फोट इतका जोरदार होता की, 10 ते 12 किमी पर्यंत आवाज ऐकू आला. या स्फोटात आठ लोकांचा मृत्यू झाला, तर 50 जण आगीत होरपळले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. घटनेनंतर फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. फॅक्टरी अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात होती.

जिल्हा प्रशासन वरिष्ठ अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. कंपनीत कोणतीही सुरक्षा उपकरणे उपलब्ध नव्हते, उशीरापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा न मिळाल्याने आगीत होरपळलेले मजूर घटनास्थळीत पडून होते. भरूच जिल्हा सुरक्षा आणि आरोग्य विभागाने कंपनीला क्लोजर नोटीस जारी केली आहे.

तर, मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या नातेवाईकांना चार-चार लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच आगीत जखमी झालेल्यांना सुद्धा मदतीची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

दरम्यान, काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत राज्य सरकारच्या औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केला आहे. पटेल यांनी मजूरांच्या कायद्यात केलेल्या बदलाला सुद्धा मजूरविरोधी असल्याचे म्हटले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like