Surat Crime | कलयुग ! घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न करण्यासाठी 18 वर्षांच्या मुलीने रचला ‘कट’; संपूर्ण कुटुंबाला खाऊ घातले विष टाकलेले पराठे

सूरत : Surat Crime | सूरतमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांना विष दिल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. आरोपी मुलीचे नाव खुशबू असून ती 10वीपर्यंत शिकली आहे. तिचा प्रियकर सचिन हा बेरोजगार आहे, त्याच्या वडीलांचे सुद्धा एफआयआरमध्ये (Surat Crime) नाव आहे.

एकाच सोसायटीमध्ये राहत होते

याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी प्रॉपर्टी ब्रोकर अशोकला अटक केली आहे. खुशबू आणि सचिन फरार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सूरतच्या डिंडोली परिसरात खुशबू आणि सचिनचे कुटुंब एकाच सोसायटीमध्ये राहते. या दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर प्रेम जुळले.

दोन वर्षापूर्वी सुद्धा पळून गेली होती

मात्र, खुशबूचे आई-वडील तिच्या संबंधांच्या विरूद्ध होते कारण ती अल्पवयीन होती. दोन वर्षापूर्वी ती सचिनसोबत पळून गेली होती. परंतु तिला परत आणले गेले आणि तिचे कुटुंब दुसर्‍या परिसरात राहायला गेले.

18 व्या वाढदिवसानंतर पळून जाण्याचा प्लान

पोलिसांनुसार, खुशबूने सचिनसोबत आपले नाते कायम ठेवले आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी प्रौढ वय होण्याची वाट पहात होती.

खुशबूच्या 18व्या वाढदिवसाच्या दोन दिवसानंतर, तिने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याची योजना तयार केली आणि दोघांनी 12 डिसेंबरला तिच्या आई-वडीलांना बेशुद्ध करून घरातून पळून जाण्याचा कट रचला. तिने आपल्या कुटुंबाला पराठे बनवताना त्यामध्ये विष (Surat Crime) टाकले.

वडीलांना दुसर्‍या दिवशी आली जाग

जेवल्यानंतर जेव्हा तिचे आई-वडील बेशुद्ध झाले तेव्हा अशोक कथित प्रकारे खुशबूला घेण्यासाठी आला. यानंतर ती सचिनसोबत पळून गेली. तिचे वडील वंजारा यांना दुसर्‍या दिवशी सकाळी उशीरा जाग आली, यावेळी मुलगी गायब असल्याने ते बेचैन झाले. त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला जागे केले.

या दरम्यान पोलिसांनी वंजारा यांना फोन करून माहिती दिली की, त्यांची मुलगी पतीसोबत पोलीस ठाण्यात आली आहे.

दोघांवर गुन्हा दाखल

लग्नाचे रजिस्ट्रेशन करून खुशबू आणि सचिन पोलीस ठाण्यात पोहचले होते.
प्रौढ असल्याने दोघांना जाऊ देण्यात आले.
यानंतर वंजारा, त्यांची पत्नी आणि भावाची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल.
बरे झाल्यानंतर वंजारा यांनी तक्रार दाखल केली.
खुशबू, सचिन आणि अशोक यांच्यावर विष आणि कट रचून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Parambir Singh | परमबीर सिंह बेपत्ता, CID कडून शोध सुरु, नेपाळमार्गे लंडनला पळाले?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Surat Crime | surat shocker the girl hatched a conspiracy to run away from home and marry her lover fed poison paratha to the whole family

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update