अग्निकांडानंतर आता ‘त्या’ विद्यार्थ्यांना शिकावं लागतंय स्मशानभूमीत

अहमदाबाद : वृत्तसंस्था – सुरतमध्ये झालेल्या अग्निकांडानंतर राज्यातील अनेक क्लास बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानंतर आता तिथे खूप विचित्र परिस्थिती असून क्लासच्या मालकांनी सरकारी ऑफिसचे कंपाउंड, गार्डन आणि स्मशानभूमीतही क्लासेस सुरु केले आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना मजबुरीने आता स्मशानभूमीत क्लाससाठी जावं लागत आहेत.

बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर स्मशानभूमीत सध्या क्लासेस सुरु असून विध्यार्थाना मजबुरी म्हणून तिथे जावं लागत आहे. ज्या क्लासची फायटर सेफ्टीची प्रकिया पूर्ण झाली तरी प्रशासनाकडून त्यांना अजून एनओसी दिला जात नाही. त्यामुळे आम्हाला मजबुरीमूळे स्मशानभूमीत क्लाससाठी जावं लागत आहे. असे तेथील एका विद्यार्थ्याने सांगितले.

दरम्यान सुरतमधील तक्षशिला आर्केड बिल्डिंगमध्ये झालेल्या अग्निकांडात २० विदयार्थ्यांचे जीव गेले. ज्या मजल्यावर हे अग्निकांड झाले ते फायबर ने बनवलं असल्यामुळे ती आग नियंत्रणात आली नाही. म्हणून त्या विद्यार्थ्यांना वाचवता आले नाही. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे आणि शिक्षणाचे जर हे हाल असतील तर हि खूप विचार करायला लावणारी आणि शोकांतिकेची गोष्ट आहे.