Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ‘या’ सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘कारभारी दमानं’ म्हणत रसिकांना साद घालणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस भवनात होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मागिल महिन्यात सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक (Assembly election) लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.

सुरेखा पुणेकर यांना विधान परिषदेवर आमदार होण्याची इच्छा आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. पण तेव्हापासूनच सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात तमाशाचे फड रंगवणाऱ्या सुरेखा पुणेकर आता राजकारणाचा फड रंगवणार का? हे आगामी काळात पहायला मिळेल.

आजपर्यंत कलेची सेवा काली. आता राजकारणात (politics) येऊन जनतेची सेवा करायची आहे. महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत. गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळेच 16 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली.

 

राजू शेट्टींच्या जागी सुरेखा पुणेकर?

विधान परिषदेच्या 12 जागांची यादी राज्यपाल यांनी अद्याप मंजूर केली नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार, राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचे नाव दिले होते.
राज्यपालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे शेट्टी यांच्या जागेवर सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागणार का ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Titel :- Surekha Punekar | lavni samradni surekha punekar will be joinncp in mumbai on 16 sept in presence of DCM ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही’, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून खळबळजनक वक्तव्य, राऊतांनी केला हल्लाबोल

Insecure Apps | ‘गुगल प्ले’वर 19 हजारपेक्षा जास्त अ‍ॅप असुरक्षित, अतिशय खासगी माहिती होऊ शकते सार्वजनिक; सुरक्षेचे ‘हे’ 5 उपाय लक्षात ठेवा, जाणून घ्या

CoWin पोर्टलद्वारे आता दुसर्‍यांच्या व्हॅक्सीनेशनची सुद्धा मिळेल माहिती, आरोग्य मंत्रालयाने लाँच केले नवीन फीचर; जाणून घ्या