Surekha Punekar | राष्ट्रवादी पक्षात प्रवेश का? लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा आज (16 सप्टेंबर) रोजी राष्ट्रवादी काॅग्रेस (NCP) पक्षात प्रवेश आहे. या पार्श्वभुमीवर सुरेखा पुणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादीतच प्रवेश का? याचं कारण स्पष्ट केलं आहे. आजपर्यंत कलेची भरपूर सेवा केली आता गोरगरीब जनता, महिला आणि लोककलावंतांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यासाठी सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास व तळमळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (Nationalist Congress Party) निवड मी केली आहे. आज माझा पक्ष प्रवेश होणार आहे. यामागे कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा व अपेक्षा नाही; पण भविष्यात पक्षाने एखादी जबाबदारी सोपविल्यास मी मागेही सरकणार नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.

सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) या आज (16 सप्टेंबर) रोजी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षात प्रवेशावरुन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी त्या म्हणाल्या, लोककला सादरीकरणाच्या निमित्ताने छोट्याशा खेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतचा आजवर खूप मोठा प्रवास झाला.
गोरगरीब जनतेचे प्रश्न अडचणी जवळून पहिल्या, खूप वाटायचे त्यांच्या समस्या मांडाव्यात, सोडवून घ्याव्यात, परंतु केवळ भावनिक होऊन गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता.
प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय ताकदही पाठीशी असायला हवी म्हणूनच मी राष्ट्रवादीची निवड केली आहे.

पुढं बोलताना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, विकासाची नेमकी दृष्टी असलेला हा पक्ष असून, अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे
(MP Supriya Sule) ही गरीब, कष्टकरी जनता व कलावंतांच्या विकासाची तळमळ असलेली नेतेमंडळी आहेत. राजकारणात गेले तरी माझ्यातील कला व कलाकार थांबणार नाही.
कार्यक्रम सुरूच आहेत व सुरूच राहतील. सध्या अनेक कलाकार राजकीय व कला क्षेत्रात कार्यरत आहेत, मीही त्याप्रमाणे योगदान देईन.

 

माझ्या कलेचा चाहता वर्ग राज्यभर आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांचे मजबूत संघटन
आणि सर्वसामान्य जनता व कलावंतांचे प्रश्न सोडविण्यास माझे प्राधान्य राहील.
तसेच, कार्यक्रम बंद असल्याने काही जण भाजीपाला विकताहेत, धुणीभांडीही करताहेत.
उपाशी मारण्यापेक्षा बाहेर कोरोनाने मेलेले बरे अशीही भावना कलाकार व्यक्त करताहेत.
आता या राजकीय व्यासपीठाचा मला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चांगला उपयोग होईल.
असं सुरेखा पुणेकर यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Surekha Punekar | political news lavani artist surekha punekar will join ncp today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Modi | खालिस्तानी दहतवाद्यांच्या गटाने दिली PM मोदींना धमकी, म्हणाले – ‘तुम्हाला शांत झोपू देणार नाही’

PMC Worker 7th Pay Commission | पुणे महापालिकेतील 15 हजार कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू, येत्या दोन-चार दिवसात ‘जीआर’ काढणार