Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. अखेर त्यांनी आज (16 सप्टेंबर) रोजी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम पार पाडला.

सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांच्यासह गायिका देवयानी बेंद्रे यांनीही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्याच बरोबर इतर कलाकारांचा देेखील राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये‌ (NCP) जसे सर्व जातीधर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहीजे, ही शरद पवार यांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

दरम्यान, आतापर्यंत कलेची सेवा केली आणि जनसेवा करण्यासाठी राजकारणात यायचंय.
महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
या दरम्यान, सुरेखा पुणेकर राजकीय मैदानात उतरणार असल्याचं नेहमी बोललं जायचं.
मागील वेळी पुणेकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचं बोललं होतं.
तेव्हापासून सुरेखा पुणेकर राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित होतं.
राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

Web Title : Surekha Punekar | surekha punekar joins ncp welcomed ajit pawar mumbai office

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार

Pune NCP | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 215 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी