Surekha Punekar | ‘घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?’ – लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Surekha Punekar | शिरूर येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेने आयोजित केलेल्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे (BJP) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) बोलत होते. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरच्या (Surekha Punekar) राष्ट्रवादी प्रवेशावरुन दरेकर यांनी अप्रत्यक्षपणे वादग्रस्त विधान केलं होतं. दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली. त्यांनतर आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर दरेकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. महिलेचा अपमान करणं तुम्हाला शोभलं का?, घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय? अशा शब्दात जोरदार प्रश्न पुणेकर यांनी उपस्थित केलाय.

सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. यांच्या प्रवेशावरुनच दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जोरदार टीका केली होती. आम्ही थोबाड आणि गाल रंगवू शकतो, असा इशारा यावेळी दरेकरांना रुपाली चाकणकर यांनी दिला. यांनतर आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील दरेकरांच्या विधानावरुन प्रत्युत्तर दिलं आहे.

सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय? ‘मला दरेकरांबाबत खूप वाईट वाटतेय. त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कुणी दिला? आज मी धुण्याभांड्याची कामं करून इथपर्यंत आले आहे. मी जर महाराष्ट्राची कला परदेशात नेऊ शकले, घराघरात मी लावणी कला चुकवली. अशा महिलेला दरेकरसाहेब नावं ठेवत असतील तर ते साफ चुकीचं आहे. महिलांना मान देऊ शकत नाही तर ठीक आहे, पण अपमान तरी करू नका. प्रविण दरेकर यांनी 2 दिवसात माफी मागावी नाहीतर याचा परिणाम वाईट होईल. असं त्या म्हणाल्या आहेत.

हे देखील वाचा

Ola Scooter खरेदी करू शकता रात्री 12 वाजेपर्यंतच, पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला विकल्या गेल्या 4 स्कूटर !

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Surekha Punekar | surekha punekar slam bjp pravin darekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update