सुरेखा पुणेकर लावणीच्या मंचावरून राजकिय मंचावर ?

पुणे : पोलीसनामा ऑनालाईन – बीग बॉस मराठी-२ च्या घरात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपली वेगळी ओळख दाखवून दिली. बीगबॉसच्या घरात त्यांचे वक्तीमत्त्व दिसून आहे. त्यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण आहेत, हेही दिसले. त्यानंतर सुरेखा पुणेकर यांनी विधानसभा निवडणुकीत राजकीय प्रवेश करू शकतात. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची सुप्त इच्छा बोलून दाखवली.

लावणी अमेरिकेत जाऊ शकते, तर मी विधानसभेत जाऊन लोककलावंतांचे प्रश्‍न का मांडू शकत नाही, असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी यावेळी केला. तसंच यावेळी बोलताना त्यांनी मोहोळ किंवा पुणे शहरातील मतदारसंघातून राजकीय पक्षाकडून मी निवडणूक लढविण्यास तयार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विविध कला प्रकारांप्रमाणे लावणीचे स्वरूप बदलत आहे. बदलता काळ आणि नवमाध्यमांमुळे कला प्रकारामध्ये बदल होत आहेत. लावणीमध्येसुद्धा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे बदल करण्यास सुरुवात केली आहे. बदल केले नाहीत, तर लावणी कालबाह्य होईल, असंही त्यांनी यावेळी नमूद केले.

दरम्यान, त्यांनी यावेळी बोलताना लावणीचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लावणीचे योग्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी लावणी अकादमी सुरू करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या आकादमीमध्ये व्यासपीठावरून बोलण्यापासून ते लावणी सादर करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाईल. लोककला, पाश्‍चात्त्य नृत्याचा सहभाग वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. लोकांच्या आवडीप्रमाणे आपली कलाही बदलायला हवी, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात