Surekha Sikri Passes Away | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Surekha Sikri Passes Away | राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन (Surekha Sikri Passes Away ) झालं. त्या 75 वर्षाच्या होत्या. सुरेखा यांना त्यांच्या ‘बालिका वधू’ (balika vadhu) या मालिकेमधील भूमिकेने घराघरात पोहचवलं होतं. तर ‘बाधाई हो’ (badhai ho) या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. या भूमिकेसाठी त्यांना 2018 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला होता.

Surekha Sikri Passes Away | veteran actor surekha sikri dies of cardiac arrest at 75

सुरेखा सिक्री यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सिक्री गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक (Brain stroke) आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांना 2020 मध्ये दुसरा स्ट्रोक आला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचे स्वास्थ ठीक नव्हते. त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचा परिवार त्यांच्यासोबत होता.

 

 

मनोरंजन विश्वातील प्रवास

सुरेखा यांनी आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट सर्वच क्षेत्रात काम केलं. 1978 सालच्या ‘किस्सा कुर्सी’ का मधून सिनेसृष्टीत पदार्पन केले होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी 3 वेळा राष्ट्रीय पुस्कार मिळाला. तमस (1988), मम्मो (1995) आणि बधाई हो (2018) या चित्रपटांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘बधाई हो’ या चित्रपटाचा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरुन आल्या होत्या.

‘बालिका वधू’ मधील कामाचे विशेष कौतुक

‘बालिका वधू’ मालिकेतील कामाचे विशेष कौतुक झाले होते. शिवाय आयुष्यमान खुराना यांच्या ‘बधाई हो’ मध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात पसंत करण्यात आलं. नेटफ्लिक्सवरील Ghost Stories मध्ये त्यांना पडद्यावर शेवटचं पाहण्यात आलं होतं. सुरेखा यांना 1989 साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्काही मिळाला होता. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात होते तर आई शिक्षिका होती. त्यांनी हेमंत रेगे यांच्याशी लग्न केलं. या दोघांना राहुल नवाचा एक मुलगाही आहे.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने-चांदी झाले महाग, तरी सुद्धा रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 7,590 रुपये स्वस्त, चेक करा 10 ग्रॅमचा भाव

Pune Lockdown | पुणेकरांना दिलासा नाहीच ! पुण्यात सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार

Corporator Avinash Bagwe | नगरसेवक अविनाश बागवे यांना हाय कोर्टाचा दिलासा; नगरसेवकपद रद्दच्या आदेशाला दिली स्थगिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Surekha Sikri Passes Away | veteran actor surekha sikri dies of cardiac arrest at 75

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update