ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना ब्रेन स्ट्रोक, आयसीयूत दाखल

पोलिसनामा ऑलनाईन टीम – चित्रपट, मालिकांमध्ये काम करणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे त्यांना जुहूमधील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. त्यांच्या मदतीसाठी ‘बधाई हो’ या चित्रपटातील सहकलाकार गजराज राव आणि दिग्दर्शक अमित शर्मा त्यांच्या आर्थिक मदतीसाठी धावून आले आहेत.

सकाळी ज्युस पित असताना सुरेखा यांना अचानक ब्रेक स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचेही सांगण्यात आले होते. त्यानंतर अनेक कलाकार त्यांची आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, 2018 मध्येही त्यांना ब्रेक स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांच्या देखभालीसाठी एका नर्सची नियुक्ती करण्यात आली.

‘बधाई हो’ नंतर सुरेखा यांना कोणता मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही. सुरेखा यांनी 1978 मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या राजकीय चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्यांनी नाटकांत आणि मालिकांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील त्यांनी साकारलेली दादीसा अजूनही प्रेक्षकांना चांगली खिळवून ठेवते.