Surendra Kumar Hockey | ‘शेजारच्यां’नी खरेदी करुन दिली होती पहिली ‘हॉकी स्टिक’; सुरेंदरच्या आईने केला खुलासा म्हणाली, ‘मुलाने कर्ज फेडले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Surendra Kumar Hockey | भारताने जर्मनीवर ५-४ अशी मात करुन हॉकीत कांस्य पदक पटकाविल्याने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो भारतीयांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी भारतीय टीममधील एक खेळाडु सुरेंदर (Surendra Kumar Hockey) याच्या यशस्वी कारर्किदीची कहाणी सर्वांसमोर आणली आहे.

सुरेंदर कुमार हे सहावीत असताना त्याने हॉकी खेळण्यास सुरुवात केली. तेव्हा आईने तु हॉकीत काही करु शकणार नाही, असे म्हणाल्या. त्यावेळी त्यांनी आपल्या वडिलांना हॉकी स्टिक विकत घेऊन देण्याची मागणी केली. मात्र, वडिलांनी नकार दिला. तेव्हा पुरुषोत्तम नावाचे एक शेजारी रहात होते. त्यांनी सुरेंदर याला ५०० रुपयांची हॉकी स्टिक खरेदी करुन दिली होती. त्याने सुरेंदरने हॉकी खेळण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्याचे कोच गुरविंदर यांनी सांगितले की, त्याला हॉकी खेळू द्या, तो त्यातच काही करुन दाखवेल. सुरेंदरचा खेळ पाहून त्याच्या आईने त्याला हॉकी स्टिक घेऊन दिली. त्याच्या खेळासाठी काही कमी पडु नये, म्हणून त्यांनी आपला इतर खर्च कमी केला. भारताच्या विजयाबाबत त्या म्हणाल्या, मुलाने आजवरचे सर्व कर्ज फेडले असून संपूर्ण देशाला आनंद मिळवून दिला आहे.

 

Web Title : Surendra Kumar Hockey | ‘Neighbors’ bought the first ‘hockey stick’; Surender’s mother reveals, ‘son pays off debt’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या DA मध्ये झाली वाढ, जाणून घ्या कोण-कोणत्या राज्यात कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल वाढ

Pune Corporation | भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात ‘गोलमाल’; खोटे बिल काढल्याप्रकरणी उपअभियंता टुले निलंबित तर कनिष्ठ अभियंत्याची खातेनिहाय चौकशी

Amruta Fadnavis | पुण्यातील निर्बंधाबाबत अमृता फडणवीस ‘संतापल्या’; म्हणाल्या… (व्हिडीओ)