Suresh Dhas | जमीन घोटाळा प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर गुन्हा

बीड: पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आठ देवस्थानाच्या जमिनींचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश धस यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ मनोज रत्नपारखी आणि अस्लम पठाण यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार 13 (1) (अ) (ब), 13 (2) , भा. द. वि. 465, 468, 471, 120 ब, 109 कलमांतर्गत आष्टी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. तसेच विरोधक भाजपवर तोंडसुख घेत आहेत.

त्यांचा या प्रकरणात किती समावेश आहे, हे आगामी काळात कळेल.
पण, तोपर्यंत सुरेश धस चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
त्यांच्यावर देवस्थानच्या जमीन घोटाळ्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
सुरेश धस बीड जिल्ह्याच्या आष्टी भागातून विधान परिषदेवर आमदार आहेत.
ते मागील काळात तीन वेळा आष्टी भागातून विधानसभेवर देखील निवडून गेले होते.
ते भाजपमध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते.

Web Title :- Suresh Dhas | case has been registered against bjp mla suresh dhas in ashti police station beed news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर