Suresh Kote Lijjat Papad | कर सल्लागार अर्थव्यवस्थेला चालना देणारा दुवा ! सुरेश कोते यांचे प्रतिपादन; ‘एमटीपीए’तर्फे 15 व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Suresh Kote Lijjat Papad | “कर सल्लागार (Tax Advisor) हा शासन आणि करदाते यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था (Economy) सक्षम होत आहे. लोकांना कर (Tax) भरण्यासाठी प्रेरित करण्याची भूमिका कर सल्लागारांनी निभवावी. कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून देण्यासाठी कर सल्लागारांनी प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड समूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते (Suresh Kote Lijjat Papad) यांनी केले.

 

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने आयोजित १५ व्या कर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सुरेश कोते (Suresh Kote Lijjat Papad) बोलत होते. शिवाजी रस्त्यावरील ‘एमटीपीए’च्या सभागृहात शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे (North Maharashtra Tax Practitioners Association) अध्यक्ष अनिल चव्हाण (Anil Chavan), ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर (Manoj Chitlikar), उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर (Shripad Bedarkar), सचिव ज्ञानेश्वर नरवडे (Dnyaneshwar Narwade), अभ्यासक्रम चेअरमन स्वप्नील शहा (Swapnil Shah), समन्वयक मिलिंद हेंद्रे (Milind Hendre), अमोल शहा (Amol Shah), माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे (Narendra Sonawane), शरद सूर्यवंशी (Sharad Suryavanshi), मिलिंद भोंडे (Milind Bhode), सीए अविनाश मुजुमदार (CA Avinash Mujumdar), व्ही. एन. जोशी (V. N. Joshi), ऍड. व्ही. जी. शहा (Adv. V. G. Shah), पदाधिकारी अनुरुद्र चव्हाण (Anurudra Chavan), अश्विनी बिडकर (Ashwini Bidkar), अश्विनी जाधव (Ashwini Jadhav), ऍड. उमेश दांगट (Adv. Umesh Dangat) आदी उपस्थित होते.

 

 

सुरेश कोते म्हणाले, “कर सल्लागार हे स्वयंरोजगार देणारे शाश्वत क्षेत्र आहे. यातील बदल आत्मसात करत व्यवसाय वाढीसाठी सतत नवनव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. हा व्यवसाय ज्ञानाधारित आहे. बदलती करप्रणाली (Tax System) समजून घेत करदात्यांना चांगली सेवा देण्यावर आपण भर दिला पाहिजे. शिक्षण तुम्हाला ओळख, मानसन्मान मिळवून देते. त्यामुळे जिज्ञासू, चौकस वृत्तीने सतत शिकत राहिले पाहिजे. कर सल्लागारांना चांगले प्रशिक्षण देण्यासाठी ‘एमटीपीए’ राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.”

 

 

“जगातील सर्वात मोठी महिलांची संस्था अशी श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड (Shri Mahila Griha Udyog Lijjat Papad) समूहाची ओळख आहे. वेगळ्या विचारांवर उभा असलेल्या या संस्थेत आज देशभर ५० हजार महिला काम करताहेत. महिला सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) कार्यरत संस्थेला ६० वर्षे होत असून, या संस्थेशी जोडल्याचा आनंद आहे,” अशी भावना कोते यांनी व्यक्त केली.

 

 

अनिल चव्हाण म्हणाले, “आज सर्वत्र चांगल्या कर सल्लागाराची गरज आहे. कर प्रणाली आपण समजून घेतली पाहिजे. चांगली सेवा दिली तर कर सल्लागार म्हणून यशस्वी व्हाल. कर रचनेतील बारकावे समजून घेत क्लायंटला विश्वासार्ह सेवा देण्यावर आपला भर असला पाहिजे. ग्रामीण भागातील कर सल्लागारांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यायला हवे.”

 

मिलिंद हेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. आभार श्रीपाद बेदरकर यांनी मानले.

 

Web Title :- Suresh Kote Lijjat Papad | The link that drives the tax advisor economy! Statement by Suresh Kote; Inauguration of 15th Tax Certificate Course by MTPA

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा