सुरेश रैनाने आणखी धावा केल्या असत्या : राहुल द्रविड

पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर रैनानेही आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीच्या बातमीमुळे रैनाची फारशी चर्चा झाली नाही, परंतू भारतीय संघात सुरेश रैनाचे योगदानही मोठे आहे. माजी खेळाडू राहुल द्रविडनेही रैनाचे कौतुक करत फलंदाजीत त्याला वरच्या क्रमांकावर संधी मिळाली असती तर रैनानेही आतापेक्षा जास्त धावा केल्या असता असे म्हटलें आहे.

द्रविडच्या हस्ते सुरेश रैनाला भारतीय वन-डे आणि कसोटी संघाची कॅप मिळाली होती. गेल्या दशकभरात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेक विक्रम केले. अनेक चांगले क्षण भारतीय संघाला अनुभवायला मिळाले आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघासाठी दिलेले योगदान हे कौतुकास्पद आहे. विश्वचषक आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा तो सदस्य आहे. मैदानात वावरत असताना त्याची उर्जा ही एका वेगळ्या पातळीवर असते. आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ रैनाने मधल्या फळीत फलंदाजी केली. अवघड जागी क्षेत्ररक्षण केले तर गरज असेल तेव्हा गोलंदाजी करुन विकेट मिळवून दिल्या. त्याला वरच्या क्रमांकावर संधी मिळाली असती तर त्याने अधिक धावा केल्या असत्या असे म्हटले आहे. .