राहूल द्रविडने पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करण्यासाठी बनवला होता भन्नाट प्लॅन

पोलिसनामा ऑनलाईन – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणेच आणखी एका कर्णधारानेदेखील पाकिस्तानच्या गोलंदाजाला बाद होण्याससाठी सापळा रचला होता. 2006 च्या भारत-पाक सामन्यातील या प्रसंगाबाबत आघाडीचा क्षेत्ररक्षक सुरेश रैना याने एक किस्सा सांगितला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगला होता. त्यावेळी राहुल द्रविड कर्णधार होता. मला अजूनही कामरान अकमलचा मी घेतलेला झेल आठवतो. इरफान गोलंदाजी करत होता. त्यावेळी झेल घेण्यासाठी फिल्डरच्या 15 यार्डच्या वर्तुळाच्या आत ठेवावे लागते असे. मला द्रविडने विचारले की पॉईंटला फिल्डिंग करशील का? मी म्हंटले हो, नक्कीच! कुठे उभा राहू सांग. त्याने मला एक जागा सांगितली आणि म्हणाला की वाकुनच उभा राहा, कधीही झेल येईल. इरफानला द्रविडने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकायला सांगितला. अकमलने तो चेंडू टोलवला आणि मी पटकन उडी मारून झेल टिपला, असे रैनाने सांगितला. भारत-पाक यांच्यातील त्या क्रिकेट मालिकेत द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने 4-1 असा विजय मिळवला होता. मात्र 2007 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर द्रविडला कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले. त्या स्पर्धेत भारत साखळी फेरीतच गारद झाला होता.