Surgical Strike | ती रात्र…जेव्हा लष्कराने PAK मध्ये 3 किलोमीटर आत घुसून उडवली दहशतवाद्यांची ठिकाणे, 4 तासात केला होता 38 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला (Surgical Strike) आज 5 वर्ष पूर्ण झाली. 2016 मध्ये याच दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी हद्दीत जाऊन दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली होती. हा दिवस भारतीय जवानांच्या धाडसी पावलाचा साक्षीदार म्हणून नोंदला गेला. प्रश्न असा आहे की भारताने सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) का केला? मात्र, भारतीय लष्कराने यापाठीमागे सीमेपलिकडून सातत्याने होत असलेल्या घुसखोरीचे कारण सांगितले आहे. परंतु, जाणकार या पाठीमागील कारण वेगळे मानतात.

19 भारतीय जवान झाले होते शहीद

2016 चा सप्टेंबर महिना होता, जम्मू-काश्मीरमध्ये सीमेलगतच्या उरी सेक्टरमध्ये दशहतवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला.
या हल्ल्यात 19 भारतीय जवान शहीद झाले.

जैश-ए-मोहम्मद (Jaish-E -Mohammed) च्या दहशतवाद्यांनी उरीमध्ये भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टरवर केलेल्या हल्ल्याने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते.
यानंतर केंद्र सरकारने जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्लान (Surgical Strike) तयार केला.

28-29 सप्टेंबरच्या रात्री लष्कराने केवळ 4 तासात ऑपरेशनमध्ये पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.
लष्कराने रात्री सुमारे 12.30 वाजता ऑपरेशन ‘बंदर’ची सुरूवात केली आणि सकाळी 4.30 पर्यंत दहशतवाद्यांचे काम तमाम केले.
या संपूर्ण ऑपरेशनमध्ये स्पेशल फोर्सेस आणि पॅरा कमांडोसुद्धा सहभागी होते.

Gold Price Today | जारी झाले सोने-चांदीचे दर, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

MI 17 हेलिकॉप्टरने 150 कमांडोजना सीमेजवळील एलओसी नजीक उतरवण्यात आले म्हणजे एयरड्रॉप करण्यात आले.
यानंतर भारतीय जवानांनी हळुहळु पाकिस्तानी सीमेत घुसून काम तमाम केले.
या दरम्यान भारतीय कमांडो नाईट व्हिजन डिव्हाईसेस, स्मोक ग्रेनेड्स, तवोर आणि एम-4 सारख्या रायफल, अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर आणि हेल्मेटवर लावलेल्या कॅमेर्‍याने सज्ज होते.

मार्च करत कमांडो पाकिस्तानमध्ये तीन किलोमीटर आत घुसले होते. पीओकेच्या भिंबर, हॉटस्प्रिंग, तत्तापानी, केल, लीपा सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने कारवाई केली आणि ताबडतोब फायरिंगने दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड उद्ध्वस्त केले.
या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे 38 दहशतवाद्यांना ठार केल्याचा आणि तिथे असलेल्या दोन पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा नंतर भारतीय लष्कराने केला होता.

विशेष म्हणजे या कारवाईत भारताच्या कोणत्याही कमांडोचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, आणि ते यशस्वीपणे ऑपरेशन पूर्ण करून भारतात परतले.
सकाळी 4.30 वाजले होते आणि लष्कराचे कमांडो भारतात परतले होते.

यानंतर भारताने घोषणा केली की, भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खातमा केला आहे.
या ऑपरेशनवर भारतीय जवानांच्या धाडसाची कथा सांगणारा ‘उरी’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Surgical Strike | five years of surgical strike indian army surgical strike on pakistan revenge of uri attack story of surgical strike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update