आश्‍चर्यकारक ! मृत्यूनंतर तिरडीवरून उठून ‘त्याने’ वाढदिवसाचा केक कापला

लखनऊ : वृत्तसंस्था – मृत्यू झालेल्या व्यक्तीने तिरडीवरून उठून केक कापल्याचे ऐकून आपल्याला आश्चर्य़ाचा धक्का बसले. मात्र, असे घडले आहे. उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहणाऱ्या लाल बिहारी या व्यक्तीला २५ वर्षापूर्वी मृत घोषीत करण्यात आले आहे. मात्र लाल बिहारी हे जिवंत असून ते आपला वाढदिवस तिरडीवरून येऊन केक कापून साजरा करतात. २५ वर्षापासून ते आपला पुर्नजन्माचा सोहळा मोठ्या थाटात साजरा करतात.

लाल बिहारी यांनी यावर्षीचा पुर्नजन्माचा सोहळा चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या उपस्थितीत साजरा केला. सतिश कौशिक लाल बिहारी यांच्या जिवनावर आधारीत एक चित्रपट करत आहे. याविषयी लाल बिहारी सांगतात, सरकारी अधिकाऱ्यांनी १९७६ मध्ये त्यांना कागदोपत्री मृत घोषीत केले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी मृत घोषीत केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी न्यायालयीन लढा देऊन आपण जिवंत असल्येचे सिद्ध केले. १ जुलै १९९४ साली त्यांनी न्यायलयीन लढा जिंकला त्यामुळे याच दिवशी ते आपला पुर्नजन्माचा सोहळा साजरा करत असल्याचे लाल बिहारी यांनी सांगितले.

सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी उत्तर प्रदेश सरकाने आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल २० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने याबाबद विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी कागदपत्रे गहाळ झाले असल्याचे सांगून चौकशी सुरु असल्याचे सांगत आहेत.

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा

You might also like