पुण्यात ऐकाव ते नवलच; पायात स्लीपर असल्याने हॉटेलमध्ये नो-एंट्री

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यात कधी काय घडेल याचा नियम नाही. पायात स्लीपर आणि अंगात शॉट्स घातल्याने आयटी क्षेत्रात काम करणार्‍या एका ग्रुपचा प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यांच्या या पेहरावामुळे त्यांना हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही. ही घटना घडली आहे सेनापती बापट रस्त्यावरील एजंट जॅक या हॉटेलमध्ये. या घटनेमुळे आयटी क्षेत्रासह हॉटेल क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B0756W2GWM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5143116-84db-11e8-924d-e72e7dc0fb08′]

सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवर्समधील एजंट जॅक हॉटेलमध्ये आयटी क्षेत्रात काम करणार्‍या युवक-युवतींचा एक गु्रप मंगळवारी 11 वाजता गेला होता. त्यावेळी त्यांच्या पायात स्लीपर आणि अंगात शॉट्स होती. ते कारण देवुन हॉटेल व्यवस्थापनाने सर्वांनाच हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारल्यानंतर हॉटेलच्या संचालकांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी रिसेप्शन लॉबीमध्ये लावण्यात आलेल्या नियमावलीकडे बोट दाखविले.

[amazon_link asins=’B07D3VVR74′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3ca8451-84db-11e8-8e21-41766bc2876d’]

संबंधित ग्रुपने याप्रकरणाची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात केली असून हॉटेलविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे. हॉटेल व्यवस्थापनाची ही भुमिका घटनाबाह्य असून खासगी नियम म्हणजे मुलभुत अधिकारावर गदा आणाणारे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संबंधित ग्रुपमधील संगणक अभियंता विराज मुनोत यांनी केली आहे.