आश्चर्य! भर पावसात रत्नागिरीतील आंब्याच्या झाडाला मोहर

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन

आंबा म्हटले की सर्वांच्या नजरे समोर येतो तो रत्नागिरीचा हापूस आंबा. आंब्याच्या सिझनमध्येच झाडांना मोहर येतो हे आपण ऐकले आहे आणि पाहिले देखील असेल. मात्र भर पावसाळ्यात रत्नागिरी शहर आणि परिसरात आंब्याच्या काही झाडांवर मोहर आला आहे. यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
[amazon_link asins=’B01DU5OJCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’14d0068b-a3ac-11e8-899b-39eea1e3dfa2′]
साधारण दिवाळीनंतर किंवा ऑक्टोबर महिन्यानंतर आंब्याला मोहर फुटतो हे सर्वांना माहित आहे. मात्र रत्नागिरीत चक्क पावसाळ्यात आंब्याला मोहर फुटल्याचा दुर्मिळ प्रकार पहायला मिळत आहे. रत्नागिरी शहर आणि परिसरातील आंब्यांच्या कलमांना मोहर फुटला आहे. पावसाळ्यात आलेल्या मोहरामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

याबदद्ल कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले  की, काही झाडांमध्ये झालेल्या अंतर्गत बदलामुळे मोहर फुटल्याचे दिसत आहे. झाडांचे हार्मोन्स बदल घडवतात. त्यामुळे असे बदल दिसतात. हा मोहर पावसाने झडून जाईल तर काही ठिकाणी हा मोहर टिकू शकतो असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.