मेकअपवेळी टिश्यू पेपरच्या ‘या’ खास ट्रिक वापरा, तुमचं काम होईल सोपं, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   टिश्यू पेपर एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक मुलीच्या बॅगेत असतेच आणि त्यांच्याकडे याची कमतरता देखील नसते. याचा वापर आपल्या पर्सनल हायजिनसोबतच इतरही कामासाठी केला जातो. आतापर्यंत तुम्ही टिश्यू पेपरचा वापर मेकअप रिमुव्ह करण्यासाठी, पसरलेलं लिपस्टिक किंवा काजळ आयलायनर काढण्यासाठी करत आला आहात. परंतु याव्यतिरिक्त देखील टिश्यू पेपर फार कामाची वस्तू आहे.

टिश्यू पेपर संबंधित ब्युटी ट्रिक्स जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही वापरत असलेला टिश्यू पेपर चांगल्या पेपरचा असावा. रंगीत नाही तर पांढऱ्या टिश्यू पेपरचा वापर नेहमी करा. काही टिश्यू पेपर तर न्यूट्रल पीएच लेव्हलसोबत येतात. जे त्वचेसाठी घातक नसतात. तुम्ही लो क्वालिटीऐवजी प्रिमीयम ब्रँडचे टिश्यू पेपर वापरावेत. कारण याचा वापर तुम्ही चेहऱ्यावर करु शकता. जाणून घेऊयात टिश्यू पेपरची ब्युटी ट्रिक्स, ज्याने तुमचे काम होईल सोपं.

नॉर्मल लिपस्टिकला करा मॅट

तुम्ही नेहमीप्रमाणे लिपस्टिक लावा. आता ओठावर एक टिश्यू पेपर ठेवून ओठांनी दाबावे. आता ब्रशच्या मदतीने हलका ट्रान्सलूसेंट पावडर ओठावर लावा. हे ओठांच्या रेषेमध्ये जाईल आणि तुमच्या ओठांना एक मॅट लूक मिळण्यास मदत होईल.

आयशॅडोमुळे मेकअप होणार नाही खराब

हे तुमच्यासोबत कितीतरी वेळा झालं असेल की, आयशॅडोचे कण तुमच्या गालावर पडून तुमचा मेकअप बिघडला असेल. पण तुम्ही एका सोप्या ट्रिकने ही समस्या दूर करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा आय मेकअप कराल तेव्हा गालावर एक टिश्यू पेपर ठेवा. जेव्हा मेकअप पूर्ण होईल तेव्हा टिश्यू पेपर काढा. तुमचा मेकअप बिघडणार नाही.

ब्लॅकहेड्ससाठी पोस स्ट्रिप्स

चेहऱ्यावर गरम पाण्यात भिजलेला टॉवेल ठेवा, यामुळे तुमच्या त्वचेवरील पोर्स मोकळे होती. आता एक चमचा अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि त्यामध्ये काही थेंब टी ट्री ऑईल टाका. आता टिश्यू पेपर स्ट्रिपसारखं कापा. आता नाकावर मास्कचा एक पातळ थर लावा. आता त्यावर टिश्यू पेपर ठेवा आणि त्यावरून मास्कचा आणखी एक थर लावा. 15 मिनिटांनी हे काढून टाका. याने ब्लॅकहेड्स निघून जातील.

आयर्न करताना केस जळणार नाहीत

ही ट्रिक फारच उपयोगी आहे. अधि कर्लिंग रॉड किंवा स्ट्रेटनरला टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा. असे केल्याने केसांना हीटमुळे कमी नुकसान पोहचेल आणि सोबतच तुमचे केस जळण्याचा धोका देखील कमी होईल.

लिपस्टिक जास्त वेळ टिकेल

जर तुम्हाला लिपस्टिक जास्त वेळ टिकवून ठेवायची असेल तर ही ट्रिक तुम्हाला फायदेशीर ठरेल. लिपस्टिकचा एक कोट लावा आणि आता टिश्यू पेपर ओठांच्या मध्ये ठेवा आणि दाबा. पेपर काढा. आता त्यानंतर लिपस्टिकचा दुसरा कोट लावा. तुमचे ओठ मुलायम, आकर्षक दिसतील आणि लिपस्टिक जास्त वेळ टिकेल.