चिमुकलीसोबत सुरवीनचे ‘बोल्ड’ फोटोशुट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सुरवीन चावला नुकतीच आई झाली आहे. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ‘हेट स्टोरी-2’ चित्रपटात सुरवीनने छान काम केले आहे. आई झाल्यानंतर सुरवीन नेहमीच चर्चेत असते. सुरवीनने नुकतेच तिच्या लहान मुलीसोबत बोल्ड फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहे.

 

तिने फोटोशूटची एक झलक चाहत्यांसाठी सोशल मिडियावर शेअर केले आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. ज्यामध्ये सुरवीन मुलीला आपल्या जवळ घेऊन प्रेम करताना दिसत आहे.

 

या फोटोत सुरवीन पुर्णपणे आईच्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सुरवीन चावलाने फ्रिल ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. फोटोत ती आणि तिची लहान मुलगी खुप सुंदर दिसत आहे.

 

सुरवीनने फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहले की, ‘प्रेम करणे, मला आता जाणवू लागले आहे.’

 

सुरवीन चावलाने १९ एप्रिल २०१९ ला मुलीला जन्म दिला.