अभिनेत्री सुरवीन चावलानं केला 5 वेळा ‘कास्टींग काऊच’चा ‘सामना’, म्हणाली – ‘दिग्दर्शकाला पहायची होती माझी…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अ‍ॅक्ट्रेस सुरवीन चावलानेही ग्लॅमरस इंडस्ट्रीतील इतर अ‍ॅक्ट्रेसप्रमाणे कास्टींग काऊचची शिकार झाली आहे. एका मुलाखतीत तिने कास्टींग काऊचमधील भयावह घटनेचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, आतापर्यंत तिने एकदा नाही तर पाचवेळा कास्टींग काऊचचा सामना केला आहे.

सुरवीनने सांगितल्याप्रमाणे, तिला 3 वेळा साऊथ इंडस्ट्रीत आणि 2 वेळा बॉलिवूड इंडस्ट्रीत कास्टींग काऊचचा सामना करावा लागला आहे. एका मुलाखतीत सुरवीन म्हणाली, “बॉलिवूडच्या एका डायरेक्टरला पाहायचं होतं की, माझं क्लीव्हेज कसं दिसतं. आणखी एका डायरेक्टरला माझी मांडी पाहायची होती.

साऊथ इंडस्ट्रीतील कास्टींग काऊचवर सुरवीन म्हणाली, “मला एका डायरेक्टरने रेकीसाठी सोबत येण्यास सांगितले. त्यांनी म्हटलं की, मॅम आपल्यात लँग्वेज प्रॉब्लेम आहे. मला तुमच्या बॉडीचा एक एक इंच जाणून घ्यायचा आहे.”

View this post on Instagram

Yes that’s right !!! 🙌🏼

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on

पुढे ती म्हणाली, “तेव्हा मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. नंतर मी हा सिनेमा सोडला. साऊथमधील नॅशनल अवॉर्ड विनर डायरेक्टरने कास्टींग काऊच केलं. त्याच्या एका सिनेमासाठी मी मोठी ऑडिशन प्रोसेस ठरवली होती.”

View this post on Instagram

Strawberry feels…🍓

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on

सुरवीन म्हणते, “हेट स्टोरी रिलीज झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. कारण सगळं काही मी विचार केला तसं झालं नव्हतं. केवळ मी हा सिनेमा केला याचाच मला आनंद होता.”

View this post on Instagram

Ahem ahem….🌸

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on

View this post on Instagram

🌊🧜🏼‍♀️…..

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on

 

Visit : policenama.com

You might also like